फेअरनेस क्रीमच्या जाहिरांतीवर बंदी आणा, काँग्रेस खासदाराची मागणी

July 26, 2016 2:43 PM0 commentsViews:

creams_Add_banदिल्ली, 26 जुलै : गोरं होण्याची स्वप्नं दाखवणार्‍या फेअरनेस क्रिम्सचा सध्या भडीमार सुरू आहे. हाच मुद्दा आज (मंगळवारी)राज्यसभेतही मांडला गेला आणि अशा गोरं होण्याची स्वप्न दाखवणार्‍या क्रीम्सच्या जाहिरांतीवर कायमची बंदी घाला अशी मागणी काँग्रेसचे हिमाचल प्रदेशचे खासदार विप्लोव ठाकूर यांनी केलीये.

गोरं होण्याची स्वप्नं दाखवणार्‍या अनेक क्रीम्स सध्या बाजारात आहेत. त्यावर तातडीनं बंदी घाला, अशी मागणी  विप्लोव ठाकूर यांनी राज्यसभेत केली.

अशा प्रकारच्या जाहिरातींमुळे सावळ्या किंवा काळ्या रंगाच्या महिलांमध्ये कमीपणाची भावना निर्माण होते. आणि अशाप्रकारे गोर्‍या रंगाचं उदात्तीकरण करणं अयोग्य आहे, अशी भूमिका ठाकूर यांनी मांडली. यापूर्वीही कंगना राणावतसारख्या अभिनेत्रींनी अशा फेअरनेस क्रीमची जाहिरात करायला नकार दिला होता.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close