रजनीकांतला महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्या,अनिल गोटेंची मागणी

July 26, 2016 4:01 PM0 commentsViews:

rajinikanth movie fees (5)26 जुलै : सुपरस्टार रजनीकांतला महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्या अशी मागणी भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी केलीये. गोटे यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थिती केलाय.

रजनीकांतच्या कबालीचं यश पाहून आमदार अनिल गोटे एवढे प्रभावित झाले की, त्यांनी रजनीकांतला महाराष्ट्र भूषण देण्याची मागणी केली आहे. रजनीकांत हा महाराष्ट्राचा सुपूत्र आहे. त्याचं चित्रपटसृष्टीसाठी त्याचं योगदानही मोठं आहे. त्यामुळे त्याला महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा अशी मागणी अनिल गोटेंनी विधानसभेत केलीये. तसंच रजनीकांत यांना भारतरत्न देण्यासाठीही शिफारस करावी अशी मागणीही गोटे यांनी केलीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close