हेच का लोकप्रतिनिधी ?, विधानसभेत आयबहिणीवरुन शिवीगाळ

July 26, 2016 4:38 PM1 commentViews:

मुंबई, 26 जुलै : : लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधीच लोकशाहीच्या मंदिरात सभ्यपणाची लक्तर वेशीवर टांगून एकमेकांना शिव्या देण्याची शर्मची घटना आज विधानसभेत घडलीये. भाजपचे धुळ्याचे आमदार अनिल गोटे आणि एका आमदारामध्ये वाद इतका विकोपाला गेला की एकमेकांना आयबहिणीवरुन शिवीगाळ केली.vidhan bhavan3

रजनीकांतच्या कबालीचं यश पाहून आमदार अनिल गोटे एवढे प्रभावित झाले की, त्यांनी रजनीकांतला महाराष्ट्र भूषण देण्याची मागणी केली. पण त्याच दरम्यान एका आमदाराने गोटेंना शिवराळ भाषेत टीका केली. आणि मग पुढं जे काही झालं त्यानं लोकप्रतिनिधी लोकशाहीच्या मंदिरात कुठल्या स्तराला जातात हे पहायला मिळालं. आमदार अनिल गोटे चक्क आयबहिणीवर आले. सभापतींनी मग गोटेंना थांबवलं पण ज्या आमदारानं गोटेंना अश्लिल भाषा वापरली त्यावर मात्र सभापती काही बोलले नाहीत. किंवा त्यांना समजही दिली गेली नाही. अनिल गोटेंच्या वक्तव्य पूर्ण आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही किंवा ज्या आमदारानं गोटेंसाठी खालची भाषा वापरली तीही दाखवू शकत नाही पण हा प्रसंग आपल्याला विचार करायला लावणारा आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


  • VINOD

    AATA HOIEL MHARASHTRACH KALYAAN………!

close