शूरा मी तुला वंदितो…

July 26, 2016 5:05 PM0 commentsViews:

26 जुलै : आज 17 वा कारगिल विजय दिवस…आजच्याच दिवशी भारतीय जवानांनी प्रयत्नांची शिकस्त करत टायगर हिल हे सर्वोच्च शिखर पुन्हा एकदा पादाक्रांत करून कारगिल युद्धात भारताला विजय मिळवून दिला होता. या युद्धाची आठवण म्हणून दरवर्षी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो.

या दिवसानिमित्त द्रास येथील शहीद स्मारकाच्या ठिकाणी खास कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. कारगिलच्या युद्धात शहीद झालेल्या वीरांना याठिकाणी आदरांजली अर्पण करण्यात येते. यासाठी भारतीय सेनेचे प्रमुख अधिकारी आवर्जून याठिकाणी हजर असतात.पाकिस्तानी घुसखोरांना एलओसी पल्याड पिटाळून पुन्हा एकदा भारताचा तिरंगा हिमशिखरांवर डौलानं फडकवणार्‍या ‘ऑपरेशन विजय’ मधील वीरांचा सन्मान यानिमित्ताने सन्मान करण्यात येतो. दुसरीकडे नवी दिल्लीतल्या विजय चौकातल्या स्मारकावर संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शहिदांना आदरांजली वाहिली. यावेळी तीनही सैन्यदलांचे प्रमुख उपस्थित होते.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close