‘क्षणभर विश्रांती’चा प्रीमियर उत्साहात

April 8, 2010 12:04 PM0 commentsViews: 26

भाग्यश्री वंजारी, मुंबई8 एप्रिलअभिनेता सचित पाटील दिग्दर्शित क्षणभर विश्रांती हा सिनेमा या शुक्रवारी रिलीज होत आहे. या सिनेमाचा प्रीमियर सोहळा गाजावाजात पार पडला. भरपूर काम आणि अभ्यास करुन जर तुम्हाला कंटाळा असेल तर आता वेळ आली आहे, क्षणभर विश्रांतीची…हे आम्ही नाही तर आगामी सिनेमा क्षणभर विश्रांतीची टीम सांगत आहे…अभिनेता सचित पाटील यांचे लेखन आणि दिग्दर्शन असलेला हा सिनेमा म्हणजे सुट्टीसाठीची मेजवानी असेल.या सिनेमाचा प्रीमियर सोहळा नुकताच पार पडला. यात संजय जाधव, भरत जाधव, गुरु ठाकूर, संतोष जुवेकर, अजित परब आदी सहभागी झाले होते. अर्थात क्षणभर विश्रांतीबद्दल बोलताना हा सिनेमा आणि त्यातील कलाकारांचे कौतुक करायलाही हे सेलिब्रिटीज विसरले नाहीत. सचिन आणि त्याच्या टीमची ही क्षणभर विश्रांती प्रेक्षकांना किती भावेल हे नऊ एप्रिलनंतर म्हणजेच सिनेमा रिलीजनंतरच कळेल…

close