एक्स्प्रेस वेवर भीषण अपघातात 6 विद्यार्थी ठार

July 26, 2016 5:38 PM0 commentsViews:

mumbai_pune_express26 जुलै : मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात 6 जण जागीच ठार झालेत. हे सर्व जण सिंहगड काॅलेजचे विद्यार्थी होते. ते पुण्याहून मुंबईकडे येत होते.

पहाटे अडीच ते तीनच्या सुमाराला कामशेत बोगद्याजवळ मारुती सुझुकी सियॅझ या गाडीला अपघात झाला. चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला, आणि गाडी 5 ते 6 वेळा पलटी झाली. त्यानंतर ही कार एका अवजड वाहनावर जाऊन आदळली. मृतातल्या चौघांची ओळख पटली आहे. राजाराम भिलारे,जॅकी जॉन, अदित्य भांडारकर,यश शिरली अशी या तरूणांची नावं आहेत. कारचा वेग जास्त होता. त्यामुळे नियंत्रण न राहिल्यानं गाडी समोरच्या जड वाहनावर आदळली असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. दरम्यान, यामुळे वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close