गरिबांचा विठुरायाही श्रीमंत, दानपेटीत तब्बल 2 कोटींचं दान

July 26, 2016 6:27 PM0 commentsViews:

pandhrpur 526 जुलै : पंढरपूरच्या विठुरायाच्या दानपेटीत तब्बल 2 कोटी 29 लाखांचं दान पडलंय. आषाढी एकादशीच्या काळात विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरपुरात येतात. या भाविकांनी दानपेटीत तब्बल 2 कोटी 29 लाखांचं दान टाकलंय.

लाडू आणि प्रसाद विक्रीतून मंदिर समितीला 36 लाख 37 हजार रुपये मिळालेत. तर ऑनलाईन देणग्यांच्या माध्यमातून 5 लाख तर मनिऑर्डरच्या माध्यमातून देवाच्या खात्यात 33 हजार रुपये जमा झाले आहे. मुख्य बाब म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत दानपेटीतल्या दानात 7 लाख 53 हजारांची वाढ झालीये. तिरुपती बालाजी आणि शिर्डीचे साईबाबा हे श्रीमंतांचे देव समजले जातात. पण यावेळी गरीब शेतकर्‍यांचा विठुरायाही श्रीमंत झालाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close