भारतीय सेलिब्रिटींच्या फोटोंसोबत पाक मीडियाचा खोडसाळपणा

July 26, 2016 7:00 PM0 commentsViews:

दहशतवादी बुरहान वाणीचा खात्मा केल्यामुळे पाकिस्तानचा थयथयाट सुरूच आहे. वाणीत्या खात्म्यानंंतर काश्मिरमध्ये हिंसाचाराचा भडका उडला होता त्यात आता पाकिस्तानने आग ओतायचं काम केलंय. पाकिस्तानच्या एका वेबसाईटवर भारतातील बॉलिवूडकरांसोबत विराट कोहलीच्या फोटोशी खोडसाळपणा करण्यात आलाय. फोटोशॉपच्या मदतीने या फोटोंची विटंबनाच करण्यात आलीये. हे फोटो सोशलमीडियावर व्हायरल झाले आहे. हे सर्व फोटो what if you knew the victims? या नावाच्या पेजवर शेअर केली. या फोटोमध्ये अमिताभ बच्चन, शाहरुख खान यांच्यासह विराट कोहलींच्या फोटोंवर फोटोशॉपने त्यांना जखमी अवस्थेत दाखवण्यात आलंय.

काश्मिरमध्ये वाणीच्या मृत्यूनंतर जमावाला नियंंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी पॅलेट गनची मदत घेतल्याचा आरोप या वेबसाईटने केला. या गनचा परिणाम कसा झाला हे दाखवण्यासाठी सेलिब्रिटींच्या फोटोवर जणू पॅलेट गनने गोळीबार केलाय. सेलिब्रिटीच्या चेहर्‍यावर पॅलेट गनने जखमा दाखवण्यात आल्या आहेत. त्या फोटासोबत एक मेसेज सुद्धा पसरवण्यात येत आहे. या फोटोंंमध्ये काजोल, ऐश्वर्या, आलिया यांना असं दाखवलं आहे. एवढंच नाहीतर त्यांंनी सोनिया गांधींचा फोटो देखील विद्रृप केलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close