सरपंच देणार निराधार प्रमाणपत्र

April 8, 2010 12:12 PM0 commentsViews: 5

8 एप्रिलग्रामीण भागात परित्यक्ता तसेच निराधार असल्याचे प्रमाणपत्र देण्याचे अधिकार आता ग्रामसेवक, तलाठी आणि संरपंचांनाही मिळणार आहेत. याबाबतची घोषणा अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी केली.पण हे प्रमाणपत्र या तिघांनी देणे आवश्यक असल्याचेही देशमुख यांनी स्पष्ट केले.याआधी असे प्रमाणपत्र न्यायालयातर्फेच मिळत होते. अनिल देशमुख यांनी विधानसभेत ही घोषणा केली.पण आर्थिकदृष्ट्या सक्षम असणार्‍या विधवा महिलांचा मात्र दारिद्र्य रेषेखालील घटकांमध्ये समावेश करता येणार नाही असेही देशमुख यांनी नमूद केले. केंद्रसरकारच्या निर्देशानुसार परित्यक्ता आणि निराधार स्त्रियांना दारिद्र्य रेषेखालील रेशनकार्ड देता येत नाही. त्यामुळे राज्यात आतापर्यंत सात हजार परितक्त्या आणि निराधार स्त्रियांना तात्पुरती रेशनकार्ड वितरीत करण्यात आली आहेत.त्यांना दारिद्र्य रेषेखालील दराने अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात येईल, असेही देशमुख यांनी सांगितले.

close