बबनराव पाचपुतेंना कोर्टाचा दणका, ‘साईकृपा’च्या जप्तीचा मार्ग मोकळा

July 26, 2016 7:11 PM0 commentsViews:

babanrao pachapute4426 जुलै : औरंगाबाद खंडपीठानं राष्ट्रवादीचे नेते बबनराव पाचपुते यांना चांगलाच दणका दिलाय. एफआरपीची शेतकर्‍यांची थकीत रक्कमेपायी कारखाना जप्ती विरोधात खंडपीठानं याचिका फेटाळली आहे. याचाच अर्थ पाचपुते यांचा साईकृपा साखर कारखाना जप्तीचा मार्ग आता मोकळा झालाय.

पाचपुते यांच्या साईकृपा कारखान्याने शेतकर्‍यांचे 38 कोटी थकवले होते. साखर आयुक्तांनी जप्तीचा आदेश दिला होता. मात्र या जप्तीच्या विरोधात न्यायालयात दाद मागून जप्तीवर अंतरिम स्थगिती मिळवली होती. त्यावेळेस शेतकर्‍यांचे पैसै देवू असं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र, शेतकर्‍यांना पैसे दिले नाही. या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पुन्हा खंडपीठात याचिका दाखल केली आणि जप्तीची अंतरिम स्थगिती खंडपीठानं पुढे देण्यास नकार दिला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close