व्यासपीठाचा वापर मिरवण्यासाठी,श्रीपाल सबनीसांची सदानंद मोरेंवर टीका

July 26, 2016 7:51 PM0 commentsViews:

sabanis_on_modi_sot3पुणे, 26 जुलै : साहित्य संमेलन अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी पुन्हा एकदा वादाला तोंड फोडलंय. आजपर्यंत अनेकांनी संमेलनाचं व्यासपीठ मिरवण्याकरता वापरलं असा खळबळजनक आरोप सबनीस यांनी केलाय. साहित्यिक राजन खान यांनी सबनीस यांची मुलाखत घेतली त्यात सबनीस यांनी ही भूमिका मांडली.

सबनीस यांनी सदानंद मोरे यांचं नाव टाळत याआधीच्या संमेलन अध्यक्षांनी दलित, मुस्लिम, आदिवासींच्या समस्यांची मांडणी केली नाही. साहित्य संस्कृतीला पेलून धरेल असं संचित आपल्या भाषणातून मांडलं नसल्याचा आरोपही सबनीस यांनी केला. सबनीस यांच्या आरोपांनी माजी सम्मेलनाध्यक्ष सदानंद मोरे यांनीही सडेतोड भाषेत प्रतिउत्तर दिलं.

सबनीस यांनी ताळतंत्र सोडलं असून त्यांच्याकडे तारतम्य नाही ते खोटं बोलत आहेत. आत्मप्रौढीच्या नावाखाली बीभत्स, हिडीस बोलत आहेत अशी टीका सदानंद मोरे यांनी केली. सबनीस यांचा अभ्यास नाही त्यांना संमेलन अध्यक्षाची झूल अंगावर घेतल्यावर त्याच्या इतमामानं बोला असा सल्ला पिंपरी चिंचवडच्या संमेलनाच्या व्यासपीठावरून दिला होता पण ते ऐकत नसल्यानं या पुढं सबनीस यांच्यासोबत आपण कुठल्याही व्यासपीठावर जाणार नाही असा पवित्रा मोरे यांनी घेतलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close