हा घ्या पुरावा, अजित पवारांनी काढले आदिवासी विभागाचे वाभाडे

July 26, 2016 8:15 PM0 commentsViews:

ajit_pawar_vidhansaba26 जुलै : एकच आरोप करा पण तगडा करा असं आवाहन करणार्‍या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुराव्यानिशी जोरदार प्रतिउत्तर दिलंय. अजितदादांनी विधानसभेत आदिवासी विभागाचे वाभाडेच काढले. आदिवासी शाळेत कसं निकृष्ट दर्जाचं साहित्य दिलं जातं याचा नमुनाचा अजित पवारांनी विधानसभेत सादर केला.

विरोधी पक्षाने भ्रष्ट नेत्यांची चौकशी करा अशी मागणी केली होती. पण, राज्य सरकारमध्ये एकही मंत्री भ्रष्ट नाही अशी भक्कम पाठराखण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. पंकजा मुंडे, जयकुमार रावल, रवींद्र चव्हाण, निलंगेकर यांना मुख्यमंत्र्यांनी क्लीन चिट दिली होती. परंतु, ज्या मंत्र्यांवर सीआयडीने गुन्हे दाखल केले अशा मंत्र्यांची चौकशी न करता भ्रष्ट नसल्याचं प्रमाणपत्र कसं देता असा पलटवार विरोधकांनी केला होता.

आज अजित पवार यांनी पुरावेसह आरोपास्त्र सोडले. आदिवासी शाळांमधून विद्यार्थ्यांना कसं निकृष्ट दर्जाचं साहित्य दिलं जातं. याचा नमुनाच आज अजित पवारांनी विधिमंडळात सादर केला. साधी खोबरेल तेलाची बाटली जी 30 रुपयांना मिळते त्या ठिकाणी 40 रुपयांची नकली बाटली आदिवासी विद्यार्थ्यांना दिली जाते. एवढंच नाहीतर साबण, बिस्किटचे पुडेही स्वस्त किंमतीचे खरेदी केले जाते असा आरोपही पवारांनी केला. या साहित्य खरेदी घोटाळ्याची तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणीही पवारांनी केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close