दोन रूपयाच्या वादातून तरुणाने गमावला जीव

July 27, 2016 10:39 AM2 commentsViews:

chetan12

विक्रोळी – 26 जुलै :  रिक्षा चालकांसोबत होणारे वाद मुंबईकरांसाठी नवे नाहीत. मात्र 2 रुपये सुट्टे नसल्याने रिक्षाचालकासोबत झालेला वाद एका तरुणाच्या जीवावर बेतला असल्याची धक्कादायक घटना विक्रोळीमध्ये घडली आहे. फक्त 2 रुपयांसाठी झालेल्या वादानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणार्‍या रिक्षाचालकाला पकडण्याच्या नादात रिक्षा अंगावर पडल्याने चेतन आचिर्णेकरचा मृत्यू झाला आहे. विक्रोळी पोलिसांनी रिक्षाचालक कमलेश प्रसादला अटक केली आहे.

विक्रोळीतील गोदरेज कॉलनीमध्ये राहणारा चेतन आचिर्णेकर शुक्रवारी गोव्याहून घरी परतत होता. विमानतळावरुन त्याने घरी येण्यासाठी रिक्षा पकडली होती. चेतन घरी पोहोचला तेव्हा रिक्षाचं भाडं 172 रुपये झालं होतं. चेतनकडे सुट्टे पैसे नसल्याने त्याने घरी जाऊन 200 रुपये आणि रिक्षाचालकाला दिले. मात्र रिक्षाचालकाला 2 रुपये सुट्टे देण्यासाठी नसल्याने दोघांमध्ये वाद सुरू झाला. त्यानंतर रिक्षाचालकाने चेतनला शिवीगाळ करत रिक्षा पुढे नेली. त्याचा राग येवून चेतनने रिक्षाचा पाठलाग करत रिक्षाचा दांडा पकडला. पण दुर्देवाने रिक्षाचा तोल गेला आणि चेतनच्या अंगावर पडली.

रिक्षा अंगावर पडल्यामुळे चेतनच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. चेतनला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेमुळे परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे. विक्रोळी पोलिसांनी रिक्षाचालक कमलेश प्रसाद याला अटक केली असून न्यायालयीन कोठडी बजावण्यात आली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


  • amit

    त्या रिक्षा चालकावर फसवणूक आणि अपघातास कारणीभूत ठरल्याचा आरोप लावून शिक्षा करा. 2 रुपये जरी असले तरी पळून का जायचे

    • Umesh

      - really bad- but when you are coming by flight why people are so much think about Rs 2- why they can not share Rs 5 or 10

close