डी. वाय. पाटील शैक्षणिक संस्थेवर प्राप्तिकर विभागाचे छापे

July 27, 2016 2:56 PM0 commentsViews:

sdasadsda

27 जुलै : शिक्षण सम्राट डी वाय पाटील यांच्या संस्थांवर आयकर विभागाने सकाळी साडेआठच्या सुमारास छापे टाकले. पाटील यांच्याशी संबंधित नवी मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या संस्थांवर हे छापे टाकण्यात आले आहेत. एवढचं नाही तर या ग्रुपचे सर्वेसर्वा संजय डी. पाटील यांच्या कसबा बावडा इथल्या निवासस्थानावरही छापा टाकण्यात आला आहे.

डी वाय पाटील प्रतिष्ठानची मुंबई आणि पुण्यात कॉलेजस आहेत. राजकारणात आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठा दबदबा असलेल्या डी वाय पाटलांच्या संस्थांवर छापे पडल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे.

आयकर विभागाचे अधिकारी साडेतीन तासांपासून कागदपत्रांचा कसून, तपास करत आहेत. या निमित्ताने सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अत्यंत गुप्तपणे आयकर विभागाने ही तपासणी सुरू केली आहे. या कारवाईत आयकर विभागाचे किती कर्मचारी आणि अधिकारी सहभागी आहेत हे अजून स्पष्ट झालेलं नाही.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close