कोहिनूरची ‘भारतवापसी’ अशक्य

July 27, 2016 4:44 PM0 commentsViews:

kohinoor_dimand27 जुलै : कोहिनूर हिरा भारताला परत करण्यास इंग्लंड सरकार बांधिल नाही, असं म्हणत इंग्लंडने पुन्हा एकदा भारताला झटका दिलाय. याआधीच केंद्र सरकारनंही कोहिनूर भारतात परत आणण्यासंदर्भात असमर्थता व्यक्त केली होती. त्यामुळे कोहिनूरच्या भारतवापसीवर प्रश्न निर्माण झाले आहे.

कोहिनूर हिरा भारताला परत करण्यास कोणताही कायदेशीर आधार नाही, असं ब्रिटनचे आशिया आणि पॅसिफिक मंत्री अलोक शर्मा यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच इंग्रजांनी कोहिनूर भारतातून लुटुन किंवा चोरुन नेला नव्हता, तर 19 व्या शतकात पंजाबच्या राजानं ब्रिटनच्या महाराणीला तो भेट म्हणून दिला होता. त्यामुळे कोहिनूर परत करण्याची मागणी आपण इंग्लंडकडे करू शकत नाही. असं केंद्र सरकारनं 4 महिन्यांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केलं होतं. त्यामुळे कोहिनूर भारतात येण्याची आशा धूसर होत चाललीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा