एमआयडीसी भूखंड प्रकरणी खडसेंचा ‘लक्ष’वेधीचा प्रयत्न फसला ?

July 27, 2016 5:28 PM0 commentsViews:

khadse_latur27 जुलै : मंत्रिपदावरुन पायउतार झालेले माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी एमआयडीसी भूखंड प्रकरणी लक्षवेधी मांडण्याचा प्रयत्न आज जवळपास फसला. आपल्यावर झालेल्या आरोपाचा लेखाजोखा मांडण्यासाठी खडसेंनी लक्षवेधी उपस्थित केली खरी पण अध्यक्षांनी लक्षवेधी पुढे ढकलत खडसेंच्या अपेक्षेवर पाणी फेरले.

एमआयडीसी भूखंड प्रकरण आणि इतर प्रकरणामुळे खडसेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. मध्यंतरी खडसेंनी दाऊद कॉल प्रकरण, गजानन पाटील लाच प्रकरणात क्लीन चिट मिळाली. आपल्याला पुराव्याअभावी राजीनामा द्यावा लागला असं दु:ख त्यांनी विधानसभेत बोलून दाखवलं. आज पुन्हा एकदा खडसेंनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. पिंपरी एमआयडीसीचा प्रश्न उपस्थित करत खडसेंनी आपली बाजू मांडायची होती. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी चालू असल्याने यावर उत्तर देणे सरकारला अडचणीचं ठरणार आहे हे नक्की होतं. म्हणूनच काय की या लक्षवेधीवर उत्तर न देता तिला पुढे ढकलण्याचा पर्याय अध्यक्षांनी काढला. परंतु, लक्षवेधी पुढे ढकलण्यावर राष्ट्रवादीने जोरदार आक्षेप घेतला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close