तृप्ती देसाईंनी भरचौकात तरुणाला चोपले

July 27, 2016 6:11 PM0 commentsViews:

पुणे, 27 जुलै : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक करणार्‍या एका ‘रोमिओ’ला भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी भर चौकात चप्पलाने बदाडून काढलंय. श्रीकांत लोंढे असं या तरुणाचं नाव आहे. तृप्ती देसाई यांनी कायदा हातात घेऊन या तरुणाला चांगलाच चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिला.trupti_desai34

श्रीकांत लोंढे हा शिक्रापूर येथे एका इलेक्ट्रानिक्स बॉक्स बनवणार्‍या कंपनीत काम करतो. तिथे आपल्या एका सहकारी तरुणीसोबत त्याचे प्रेमसंबंध जुळले. लग्नाचे आमिष दाखवून त्याने तरुणीसोबत संबंध ठेवले. जेव्हा लग्नाची वेळ आली तेव्हा त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यातच पीडित तरुणी गर्भवती राहिली. पीडित तरुणीला गर्भपात कर मग लग्न करू अशी मागणी घातली. तो एवढ्यावरच थांबला नाही. 3 लाख रूपये घे आणि तडजोड कर असा प्रस्तावच तरुणीला दिला.

अखेर या तरुणीने तृप्ती देसाई यांना मदतीची विनंती केली. तृप्ती देसाई यांनी या तरुणाची समजूत काढली. पण त्याने पैसे घ्या आणि प्रकरण मिटवा अशी लाच दिली. अखेर 3 लाख रूपये स्विकारण्याच्या बहाण्याने या तरुणाला आज शिक्रापूर बोलावण्यात आलं. आणि तिथे भर चौकात तृप्ती देसाईंनी 14 वं रत्न दाखवत चप्पलाने चोप दिला. या तरुणाला पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आलंयत्याच्यावर 376 आणि 313 कलमाप्रमाणे बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close