रवींद्र नाट्यमंदिरमध्ये भरलं ‘विस्तारणारी क्षितिजं’ प्रदर्शन

October 14, 2008 4:03 PM0 commentsViews: 2

14 ऑक्टोबर, मुंबई -मुंबईच्या पुल. देशपांडे अकादमीत एक आगळंवेगळं प्रदर्शन भरलं आहे. सुझा, तय्यब मेहता, प्रभाकर बर्वे, वासुदेव गायतोंडे, अकबर पद्मसी, अतुल दोडिया अशा नामवंत भारतीय चित्रकारांच्या एकसे बढकर एक कलाकृती इथं मांडण्यात आल्या आहेत.त्यासाठी पुढाकार घेतला आहे तो चित्रकार सुधीर पटवर्धन यांनी. 'विस्तारणारी क्षितिजं' हे चित्रकलेविषयीचं प्रदर्शन चित्रप्रेमींसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे. गावागावांत चित्रकलेची समज वाढावी यासाठी हे प्रदर्शन मुंबईपाठोपाठ महाराष्ट्रातील सात शहरातही भरणार आहे.गेल्या तीन पिढ्यातील चित्रकारांच्या कलाकृती इथे पाहायला मिळतात. ड्रॉइंग, पेंटिंग, शिल्प, फोटोग्राफ्स, व्हिडिओ, इन्स्टॉलेशन, प्रिण्ट मेकिंग अशा विविध माध्यमातील कलाकृतींचा त्यात समावेश आहे. मुंबईनंतर हे प्रदर्शन अमरावती, नागपूर, औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर, पुणे आणि नाशिक या आठ शहरांतही भरवलं जाणाराय. भरवलं जाणार आहे.

close