नगरमध्ये बिबट्याची पिल्ले सापडली

April 8, 2010 1:28 PM0 commentsViews: 9

8 एप्रिलअहमदनगरमधील संगमनेर तालुक्यात बिबट्याची तीन पिल्ले सापडली आहेत. खांडगाव इथे शेतात ही अगदी काही दिवसांचीच ही पिले आढळली. ऊस तोड सुरु असल्याने त्यांच्या आईने तेथून पळ काढला. आई नसल्याने ही पिल्ले कावरीबावरी झाली आहेत. पण यातील एक पिल्लू पुन्हा गायब झाल्याने बिबट्याची मादी परिसरातच असावी, या शक्यतेने गावकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

close