शिक्षकांनी आडनावावरुन चिडवलं म्हणून विद्यार्थिनीची आत्महत्या

July 27, 2016 8:56 PM0 commentsViews:

औरंगाबाद – 27 जुलै : भरवर्गात शिक्षकांनी आडनावावरुन चिडवलं म्हणून एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना जिल्ह्यातील लासूर इथं घडलीये. दिपाली गोटे असं या विद्यार्थिनीचं नाव आहे. या प्रकरणी शिक्षक संदीप गायकवाडच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलीये.dipali_student

औरंगाबाद जिल्ह्यातील लासूर इथं राहणार्‍या दिपाली गोटे ही न्यू हायस्कूलमध्ये अकरावी विज्ञान शाखेत शिकत होती. तीला गणिताचे प्राध्यापक संदीप गायकवाड हे तीच्या गोटे आडनावाची नावाची टिंगल करीत तीला गोटा म्हणून हिनवायचे आणि प्रश्न विचारायचे. प्रश्नाचे उत्तर आले नाही तर तीला गोटा म्हणायचे. या अपमानाच्या भावनेतूनच मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप मुलीच्या घरच्यांनी
केलाय. याप्रकरणी संदीप गायकवाड या प्राध्यापकावर आत्महत्येस जबाबदार धरून गुन्हा नोंदवावा अशी मागणी तीच्या वडील आणि भावानं केलीये. या प्रकरणी पोलिसात सध्या साधी तक्रार नोंदवण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close