ही आहे सर्वात वयोवृद्ध हत्तीण

July 27, 2016 9:24 PM0 commentsViews:

केरळमधल्या हत्तीणीनं एक नवी विक्रम केलाय. जगातली सर्वात वृद्ध हत्तीण म्हणून तिचं नाव गिनीज बुकमध्ये गेलंय. दक्षयानी असं तिचं नाव आहे. तीचं वय आहे 86 वर्षं…ती त्रिवेंद्रममध्ये एका मंदिरात असते. त्रावणकोर देवसम बोर्डचं हे मंदिर आहे. तिचा आज सत्कार केला गेला. तिचा फोटो असलेला एक स्टॅम्पही प्रसिद्ध करण्यात येणार आहे. याआधी जगात सर्वात जास्त वय असलेला हत्ती तैवानमध्ये होता. त्याचं वय होतं 85 वर्षं. त्याचा 2003 मध्ये मृत्यू झाला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close