पक्षनेतृत्वाबद्दल काही बोलणं म्हणजे फाशी लावून घेण्यासारखं -मनोहर जोशी

July 27, 2016 10:46 PM2 commentsViews:

27 जुलै : पक्षनेतृत्वाबद्दल काही बोलणं म्हणजे फाशी लावून घेण्यासारखं आहे असं खळबळजनक वक्तव्य शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी केलंय. पक्षात कितीही वाईट गोष्टी होत असल्या तरी आम्हाला मात्र चांगलंच बोलावं लागतं असा आरोप करत मनोहर जोशी यांनी घरचा अहेर दिलाय.

joshi_on_senaयुतीमध्ये शिवसेना सडली असं वक्तव्य खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. पण युतीत सेना सडल्याचा उल्लेख जिथे उद्धव ठाकरे यांनी केला तिथेच युती घडवून आणण्यात ज्यांचा वाटा होता ते सेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी मात्र वेगळीच चूल मांडलीये. सेना-भाजपच्या युतीमुळेच सेना सत्तेवर आली जे आधी कधी सेनेला जमलं नाही अशी टीकाच जोशी यांनी केलीये.
तसंच पक्षात कितीही वाईट गोष्टी होत असल्या तरी आम्हाला मात्र चांगलंच बोलावं लागतं असा आरोपही जोशी यांनी केलाय. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाविषयी खरं बोलणं म्हणजे स्वत:ला फाशी देण्यासारखं आहे असंही मनोहर जोशी यांनी बोलून दाखवलं. विशेष म्हणजे याआधीही जोशी यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आव्हान दिलं होतं. त्यानंतर दसरा मेळाव्यात मनोहर जोशी यांनी भर स्टेजवरुन खाली उतरावं लागलं होतं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


  • Amol Parchure

    या म्हाताऱ्याला एकदा लाथ घालून हाकलला होता. तरीपण सुधरला नाही अजून. या मनोहरला परत एकदा सर्वांच्या समोर जाहीर सभेत कायमचा पार्टीतूनच हाकलायला पाहिजे. या येड्या मनोहर ला सांगा बी जे पी त जायला आणि त्या पार्टीचा नेता मोदीच्या विरुद्ध बोलायला आणि मग काय होतंय बघायला. कुठल्याही पक्षात नेतृत्वाबद्दल जराही विरुद्ध बोललेलं चालत नाही. सांगा कोणीतरी या येड्या म्हाताऱ्याला. गप घरी बसायचं सोडून बरळतय काहीतरी.

  • Hanumant Choundkar

    Yethe mi namrapane sangto ki shivsenene joshi sarancha yogya aadar karun tyancha upyog karava shivsenela faydach hoil

close