औरंगाबाद शस्त्रसाठा प्रकरणी अबु जुंदालसह 12 जण दोषी

July 28, 2016 1:18 PM0 commentsViews:

M_Id_379607_Abu_Jundal

28 जुलै : औरंगाबादमधील 2006 च्या शस्त्रसाठा प्रकरणात 26/11 मुंबई हल्ल्याचा सूत्रधार अबू जुंदालसह अन्य 12 जण दोषी ठरले आहेत. या सर्व दोषींवरील मोक्का हटवण्यात येणार असल्याचा निर्णय विशेष मोक्का न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणातील दोषींना उद्या शिक्षा सुनावली जाणार आहे.

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने 2006 मध्ये औरंगाबाद येथील वेरुळमध्ये तीन संशयितांना अटक केली होती. त्यांच्याकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता. नंतर या पथकाने अबू जुंदालसह 22 जणांना अटक केली होती. न्यायालयाने त्यांच्यावर मोक्का लावला होता.

या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान विशेष मोक्का न्यायालयाने 22 पैकी 11 जणांना दोषी ठरवले आहे. मात्र, न्यायालयाने त्यांच्यावरील मोक्का हटवला आहे. या 11 जणांना उद्या शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

काय आहे औरंगाबाद शस्त्रसाठा प्रकरण?

  • 2006मध्ये औरंगाबाद पोलिसांनी सापळा रचून मोठा शस्त्रसाठा जप्त केला
  • शस्त्रसाठ्यात 43 किलो आरडीएक्स 16 एके 47 3 हजार 200 राऊंड्स 50 हँडग्रेनेड
  • या प्रकरणात एकूण 22 जणांना अटक
  • 2002च्या गुजरात दंगलीचा सूड घेण्याचा हेतू
  • नरेंद्र मोदी आणि प्रवीण तोगडीया रडारवर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close