कामगारांची देणी द्यावीत

April 8, 2010 2:05 PM0 commentsViews: 2

8 एप्रिलमुंबई, ठाणे आणि पुणे परिसरातील कंपन्या आणि कारखाने बंद पडत आहेत. पण या कंपन्यांमधील कामगारांची कायदेशीर देणी न देताच त्या ठिकाणी मोठमोठे मॉल्स, मल्टिप्लेक्स आणि इमारती उभारल्या जात आहेत. हा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी विधानसभेत उपस्थित केला. यावर बंद पडणार्‍या कंपन्यांच्या जागेवर उभ्या राहणार्‍या कोणत्याही बांधकामांची परवानगी देण्यापूर्वी कामगारांची देणी प्रथम अदा करणे बंधनकारक आहे. तरीसुद्धा अशा जमिनीवरील विक्री किंवा विकास प्रक्रिया तातडीने थांबवण्याची तरतूदही करण्यात आली आहे, असे कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

close