‘जसलोक’च्या सीईओला ताकीद देणार

April 8, 2010 2:18 PM0 commentsViews: 1

8 एप्रिलआमदारांशी अवमानकारक वर्तन केल्याप्रकरणी जसलोक हॉस्पिटलचे सीईओ मनेश मसंद यांना सक्त ताकीद दिली जाणार आहे. विधान परिषद सभागृहात ही ताकीद देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांनी या सभासदांची माफी मागावी, असा आदेशही देण्यात आला आहे. मसंद यांच्या विरोधात गुरूनाथ कुलकर्णी यांनी हक्कभंग प्रस्ताव मांडला होता. विधान परिषदेच्या समितीने 16 जानेवारी 2008मध्ये हॉस्पिटलकडे रेकॉर्ड मागितले होते. पण मसंद यांनी या सदस्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली होती.

close