फुटबॉल स्पर्धेत हुल्लडबाजी

April 8, 2010 2:58 PM0 commentsViews: 5

8 एप्रिलकोल्हापूर शहर फुटबॉल पंढरी म्हणून नावारुपास येत आहे. पण काही हुल्लडबाज प्रेक्षकांमुळे याला गालबोट लागत आहे.कोल्हापुरातील शाहू स्टेडियमवर फुटबॉल महासंग्राम चषक फुटबॉल स्पर्धा सुरू आहे. बुधवारी सायंकाळी कोल्हापुरातील पाटाकडील तालीम मंडळ आणि खंडोबा फुटबॉल संघादरम्यान सामना सुरू होता. त्याचदरम्यान काही हुल्लडबाज प्रेक्षकांनी किरकोळ कारणावरुन जोरदार हाणामारी सुरू केली. ही हाणामारी सुमारे 40 मिनीटे सुरू होती. त्यानंतर पोलिसांनी सौम्य लाठीमार करत हुल्लडबाज प्रेक्षकांना गॅलरीतून पांगवले.

close