‘नो हेल्मेट नो पेट्रोल’बाबत मध्यममार्ग काढू, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

July 28, 2016 5:21 PM0 commentsViews:

CM Deven28 जुलै : नो हेल्मेट नो पेट्रोलच्या सक्तीबाबत फेरविचार करण्यासाठी आपण परिवहन मंत्री दिवाकर रावतेंशी बोलून मध्यममार्ग काढू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात दिलंय.

‘नो हेल्मेट नो पेट्रोल’ चा मुद्दा राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी आज सभागृहात उपस्थित केला होता. हेल्मेट असेल तरच पेट्रोल दिले जाणार असा निर्णयच कसा घेतला जाऊ शकतो. हेल्मेट जनजागृती असणे योग्य आहे. पण फक्त पेट्रोल पंपापुरता असा निर्णय घेऊ नये अशी मागणी अजित पवारांनी केली. याला उत्तर देतांना मुख्यमंत्र्यांनी या निर्णयावर मध्यममार्ग काढण्याचं आश्वासनं दिलंय.
दरम्यान, पेट्रोल पंपचालकांनी या निर्णयाला कडाडून विरोध केलाय. त्यामुळे यावेळीही हेल्मेटसक्तीचा निर्णय बारगळणार असंच दिसतंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close