मॅगसेस पुरस्कार विजेत्या बंगाली लेखिका महाश्वेतादेवी यांचं निधन

July 28, 2016 7:10 PM0 commentsViews:

mahashweta devi28 जुलै : प्रसिद्ध बंगाली लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या महाश्वेतादेवी यांचं वयाच्या 90 व्या वर्षी निधन झालं. काही दिवसांपासून त्यांच्यावर कोलकत्याच्या एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. या आठवड्याभरात त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती. त्यांना लाईव्ह सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

महाश्वेतादेवी यांच्या सामाजिक कार्यांमुळे आणि साहित्य बद्दल त्यांना पद्मश्री, ज्ञानपीठ आणि मॅगेसस पुरस्कारानं अशा पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. देवी यांचं शिक्षण शांतीनिकेतमधून पूर्ण झालं. ‘रुदाली’ आणि ‘हजार चौरसियाँ की मॉ’ हे सिनेमे त्यांच्या साहित्याकृतीवर आधारलेले आहेत. त्यांच्या निधनामुळे साहित्यातली सरस्वती हरपली अशी भावना व्यक्त होत आहे.

महाश्वेतादेवी यांचा अल्पपरिचय

- 14 जानेवारी 1926 मध्ये ढाक्क्यात जन्म
- देवी लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या अशी त्यांची होती ओळख
- शांतीनिकेतनमधून त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं
- 1989 साहित्य अकदमी पुरस्कार
- 1986 पद्मश्री अवॉर्ड
- 1997 ज्ञानपीठ
- 1997 मॅगसेस पुरस्कार
- पद्मविभूषण, बंगविभूषण


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close