वरुणराजे लातूरकडे लक्ष असू द्या !, लातूरकर अजूनही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत

July 28, 2016 7:17 PM0 commentsViews:

latur_rain3लातूर, 28 जुलै : गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळाचे चटके सहन करणार्‍या लातूर जिल्ह्यात अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. वेळेवर पडलेल्या मान्सूनच्या पावसाने सर्वांच्याच अपेक्षा उंचावल्या होत्या पिकांना पुरेल इतका चांगला पाऊस झाला देखील. मात्र अजूनही जिल्ह्यातले नदी नाले कोरडेच असल्यानं पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या पिण्याच्या प्रश्न जशास तसा आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिक आता मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

तीन वर्षांपासून पावसानं पाठ फिरवल्यानं अभूतपूर्व दुष्काळाचा सामना लातूर जिल्ह्यातल्या प्रत्येकाला करावा लागला. मात्र, यावर्षी तरी समाधानकारक पाऊस पडेल अशी आशा सर्वांनाच होती. मान्सूनच्या पावसानं वेळेवर हजेरी लावली त्यामुळे शेतशिवार ओलं झालं. आता सगळीकडं पिकं जोमात आहेत.

पिकांना योग्य पाऊस झालाय शेतशिवारं तीन वर्षांत पहिल्यांदा हिरवीगार दिसतायेत याचं समाधान जरी वाटत असलं तरी दुसर्‍या बाजूला आणखीनही नदी नाले कोरडेठाक असल्यानं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जशास तसा आहे. जिल्ह्याभरात तेरणा नदीचं पात्र सोडलं तर कुठल्याच नदी नाल्यात पाण्याचा थेंब नाही. त्यामुळे शेतकरी जनावरांच्या पाण्यासाठी अजूनही चिंतेत आहेत. मोठा पाऊस पडावा आणि नदी नाल्यात पाणी यावं अशीच प्रार्थना सर्वजण करतायेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close