महागाईविरोधात नाशिकमध्ये जेलभरो

April 8, 2010 3:03 PM0 commentsViews: 3

8 एप्रिलवाढत्या महागाईबद्दल केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी नाशिकमध्ये डाव्या संघटनांनी जेलभरो आंदोलन केले. सीटू, आयटक, इंटक, शेकाप या संघटना यात सहभागी झाल्या होत्या. सीबीएसवर झालेल्या या आंदोलनात शंभर कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. कोल्हापुरात मोर्चाकरवीर तहसील कार्यालयासमोर आज महागाईच्या मुद्यावरून डाव्या पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. सर्वसामान्य जनता महागाईने त्रस्त झालीअसून सरकार यावर कोणतीही ठोस उपाययोजना करत नाही. सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे, असा आरोप महिलांनी केला आहे. सरकारने महागाईला तात्काळ आळा घालावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा डाव्या आघाडीच्या महिलांनी दिला आहे.

close