छान किती दिसते…8 कोटींचे पेंग्विन !

July 28, 2016 8:46 PM0 commentsViews:

मुंबई, 28 जुलै : कुणालाही भुरळ घालतील असे हे पाहुणे सध्या मुंबईच्या राणीच्या बागेत आलेत. 8 तासांचा विमान प्रवास करुन दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलमधून या पेग्विन्सना मंुबईत आणण्यात आलंय. येत्या नोव्हेंबर पासून ते सगळ्यांना पाहता येणार आहेत. अतिथंड प्रदेशात आढळणारे हे पेग्विन्स मुंबईच्या दमट वातावरणात कसे टिकणार हा प्रश्न आहे. ते इथं रुळावेत यासाठी पालिकेनं कोट्यवधींचा खर्च केलाय. आणि यालाच काँग्रेस आणि मनसेनं आक्षेप घेतलाय. केवळ बालहट्ट पुरवण्यासाठी पालिकेनं हा खटाटोप केल्याची टीका विरोधकांनी केलीय.

काळे कोटवाले मुंबईत

8 दक्षिण कोरियन जातीचे पेंग्विन
3 नर, 5 मादी पेंग्विन
त्यांचं वय 1 ते 3 वर्षांमध्ये आहे
5 माद्यांपैकी 2 पिल्ल आहेत
पेंग्विनचं प्रजोत्पादनाचं वय 2 वर्षांनंतर
वयोमर्यादा 20 ते 25 वर्षं
उंची अडीच फुटांपर्यंत वाढते
मुंबईच्या वातावरणाशी जुळवून घ्यायला लागणार 3 महिने
पेंग्विन नोव्हेंबरपासून पाहता येणार

पेंग्विनवरून वाद

8 पेंग्विनची किंमत 2.5 कोटी रुपये
पेंग्विनसाठी बनवलं जाणार एसी एक्झिबिशन सेंटर
एसी सेंटर आणि देखभालीचा खर्च साधारण 16 कोटी
ऑस्ट्रेलियन एजन्सीला देखभालीचं कंत्राट
एजन्सी देखभालीसाठी घेणार 8 कोटी
सध्या दोन ऑस्ट्रेलियन त्यांची काळजी घेतायत


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close