औरंगाबादमध्ये प्रचाराचा धडाका

April 8, 2010 3:15 PM0 commentsViews:

8 एप्रिलऔरंगाबाद महानगरपालिकेचा प्रचार अंतिम टप्प्यात असल्याने सर्वच पक्षांनी सभा, रोड शो यांचा धडाका लावला आहे. औरंगाबाद महापालिका निवडणुकीत पहिल्यांदाच उतरणार्‍या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज ठाकरेंची जाहीर सभा आयोजित केली. या सभेला औरंगाबादकरांनी मोठा प्रतिसाद दिला. दुसरीकडे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या सभेने वातावरण तापवले. शहरातील क्रांती चौकातून आज परिवहन आणि औरंगाबादचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शहर प्रगती आघाडीचे आमदार प्रदीप जैस्वाल यांनी रोड शो केला. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शहर प्रगती आघाडीच्या उमेदवारांसाठी यावेळी संयुक्त प्रचार करण्यात आला.

close