नाशिकमध्ये बाईक जाळणे सुरूच

April 8, 2010 3:19 PM0 commentsViews: 2

8 एप्रिलदहशत पसरवण्यासाठी वाहने जाळण्याचा प्रकार नाशिकमध्ये सुरूच आहे. नाशिकच्या जेलरोड परिसरात पार्वताबाई नगरमध्ये जुमानके कुटुंबाच्या दोन मोटारसायकल रात्री जाळण्यात आल्या. जुमानके यांच्या मुलाचे दुसर्‍या मुलांशी झालेल्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी हा प्रकार झाल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी नाशिक रोड पोलिसांनी पाचजणांना अटक केली आहे.

close