नक्षलवाद्यांविरोधात मानवरहित विमानांचा प्रस्ताव

April 8, 2010 3:27 PM0 commentsViews: 2

8 एप्रिलछत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 76 जवान शहीद झाल्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्रालय नक्षलवादविरोधी धोरणाचा फेरविचार करणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालय लवकरच मंत्रिमंडळासमोर नव्या नक्षलविरोधी धोरणाचा प्रस्ताव ठेवणार आहे. यासाठी विमाने आणि मानवरहित विमाने म्हणजेच यूएव्हीची मागणी करण्यात येणार आहे. फक्त बचाव आणि शोधकार्यासाठीच या विमानांचा वापर केला जाणार असल्याचे गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे.पण नक्षलविरोधी कारवाईसाठी हवाई दलाचा वापर करायला संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट नकार दिला आहे. सुरक्षेसंदर्भातील मंत्रिमंडळाची समिती याबाबत अंतिम निर्णय घेईल.

close