मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर ड्रोन कॅमेराची नजर

July 28, 2016 10:46 PM0 commentsViews:

drone in mumbai428 जुलै : वाढत्या अपघातांवर मात करण्यासाठी सरकारने नवी शक्कल लढवलीये. एक्सप्रेसवेवर लेन कटींग, ओव्हर स्पिडिंग आणि ओव्हरटेकमुळे अपघातांचं प्रमान वाढत असल्यामुळे याचं मॉनिटरिंग करण्यासाठी आता ड्रोन कॅमेराचा वापर करण्यासंदर्भात सरकार विचाराधीन आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या सुरक्षिततेबाबत आज विधानभवनात महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला एमएसआरडीसी मंत्री एकनाथ
शिंदे, परिवहन मंत्री दिवाकर रावते, गृह राज्य मंत्री दीपक केसरकर, अजित पवार आणि एक्सप्रेस वे परिसरातील आमदार या बैठकीला उपस्थित होते. त्याचसोबत 100 जणांचा डेल्टा फोर्स तात्काळ नियुक्त करून त्यांना स्पेशल पोलीस फोर्सचा (SPO) दर्जा देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. पावसाळ्यात पिकनिकमुळे ड्रंक एँड ड्राईव्हच्या केसेस वाढतात. ज्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढतं. यावर जरब बसण्यासाठी पावसाळ्यात फ्लाईंग स्कॉडची संख्या वाढवण्याची सूचना एमएसआरडीसी मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close