दिघ्यातील अनधिकृत इमारतींना मिळणार संरक्षण?

July 28, 2016 10:56 PM0 commentsViews:

digha_navimumbai28 जुलै : अनधिकृत बांधकामांना कायद्याच्या चौकटीत ‘उभारण्याचा’ प्रयत्न राज्य सरकार पुन्हा करू पाहत आहे. यासाठी लवकरच विधेयक मांडलं जाणार आहे. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत विधेयक मांडण्यास मंजुरीही देण्यात आलीये. त्यामुळे दिघ्यातील अनधिकृत बांधकामांना संरक्षण मिळण्याची शक्यता आहे.

नवी मुंबईतील दिघा आणि पिंपरी चिंचवडमधील अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा हातोडा पडलाय. अनेक कुटुंब रस्त्यावर आलीये. दिघा प्रकरणी सुप्रीम कोर्टात धाव घेण्यात आली. सुप्रीम कोर्टाने पावसाळ्यापुरता तात्पुरता दिलासा दिलाय पण कारवाई मात्र अटळ आहे. आता न्यायालयाने ज्या अटी सांगितला आहे त्या अटींच्या आधीन राहून ज्या अनधिकृत इमारती कायद्याच्या चौकटीत अधिकृत होतील असा प्रयत्न सरकार करू पाहत आहे. यासाठी सोमवारी एक विधेयक मांडण्यात येणार आहे याला आज राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिलीये. त्यामुळे दिघा आणि पिंपरी चिंचवडवासियांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, याआधीही मुख्यमंत्र्यांनी अध्यादेश जारी करून 2005 नंतरच्या अनधिकृत बांधकामांना अधिकृत करण्याची घोषणा केली होती. पण, कोर्टाने या निर्णयालाच अनधिकृत ठरवलं होतं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close