सरकारी बँकांच्या कर्मचार्‍यांचा आज संप

July 29, 2016 8:48 AM0 commentsViews:

bank-striek

मुंबई, 28 जुलै : केंद्र सरकार बँकिग क्षेत्रात करत असलेल्या विविध बदलांना विरोध म्हणून आज सरकारी बँक कर्मचार्‍यांनी एक दिवसीय संप पुकारला आहे. त्यामुळे शनिवार, रविवार पकडून 3 दिवस सलग बँका बंद असणार आहेत.

युनायटेड फोरम फॉर बँक्स असोसिएशन या 9 बँकांच्या शिखर संघटनेने हा बंद पुकारला असून त्यात जवळपास 8 लाख कर्मचारी सहभागी होणार आहेत. या संपामुळे बँकाच्या व्यवहारावर परिणाम होणार आहे.

चेक क्लीअरन्स, पैसे भरणे, पैसे काढणे यासारख्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होईल. युनाईटेड फोरम ऑफ बँक्स युनियन या शिखर संघटनेच्या नेतृत्वाखाली हा संप पुकारला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close