राज यांनी ‘मातोश्री’वर जाऊन घेतली उद्धवची भेट

July 29, 2016 7:40 PM1 commentViews:

raj and uddhav

मुंबई – 29 जुलै :  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज (शुक्रवारी) भेट घेतली. दोघांमध्येही जवळ दीड तास चर्चा झाली असून, भेटीचं नेमक कारण मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज आणि उद्धव यांच्यात एका खोलीत चर्चा केली. या चर्चेनंतर दोघांनी एकत्र जेवणही केलं. राज यांनी उद्धव यांना वाढदिवसाच्याही शुभेच्छा दिल्या. तसंच निघण्याआधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे दर्शनही घेतले.

दरम्यान, भेटीचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं, तरी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट असल्याचा अंदाज वर्तवला जात आहेत. त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे यांचा संपत्ती वाद आणि उद्धव ठाकरे-जयदेव ठाकरे यांच्यातील न्यायालयीन लढाई या पार्श्वभूमीवरही ही भेट असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

ठाकरे बंधूंच्या भेटीचा इतिहास

  • 23 नोव्हेंबर 2008 – बाळासाहेबांची पुस्तकं परत करण्याच्या निमित्ताने राज मातोश्रीवर
  • 16 जुलै, 2012 – उद्धव ठाकरेंना छातीत दुखू लागल्याने राज ठाकरे लिलावती रुग्णालयात भेटीला
  • 20 नोव्हेंबर, 2012 – बाळासाहेबांच्या अस्थिकलशाच्या दर्शनावेळी शिवाजी पार्कवर राज-उद्धव एकत्र
  • 3 नोव्हेंबर, 2014 – राज ठाकरेंच्या मुलीला अपघात, उद्धव ठाकरे भेटीला गेले असताना राज यांची भेट
  • 17 नोव्हेंबर, 2014 – बाळासाहेबांच्या स्मृतीदिनाला शिवतीर्थावर राज-उद्धव एकत्र
  • 2015 – जहांगीर आर्ट गॅलरीत उद्धव ठाकरेंच्या फोटो प्रर्दशनाला राज ठाकरेंची भेट
  • डिसेंबर 2015 – शरद पवारांच्या पंच्याहत्तरीनिमित्त राज – उद्धव एकाच व्यासपीठावर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


  • Raghuram Rajan GP

    good

close