मुंबईत कारवर झाड पडून एकाचा मृत्यू

July 29, 2016 9:18 AM0 commentsViews:

WhatsApp-Image-20160729

मुंबई – 28 जुलै :  मुंबईत कारवर झाड पडून एकाचा मृत्यू झालाय. पराग पावस्कर असं या व्यक्तीचं नाव आहे. गोरेगावच्या सुंदर नगरमधली ही घटना आहे. सकाळी साडे आठ वाजता कारवर झाड पडलं. पराग मुलीला शाळेत सोडून येत होते, आणि त्यांच्या फोक्सवॅगन व्हेंटो कारवर खूप मोठं आणि जुनं झाड कोसळलं. 6 ते 8 फुटांचा बांधा कारच्या पुढच्या भागावर कोसळला. झाड इतकं मोठं होतं की परागना स्वतःला बाहेर काढण्याची संधीच मिळाली नाही. आणखी दुखद बाब म्हणजे पराग यांचा आज वाढदिवस होता. मुलीला शाळेत सोडून घरी त्यांना ओवाळण्याचा बेत होता. ओवाळण्याची तयारीही करण्यात आली होती. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं, आणि परागच्या कारवर अचानक झाड पडलं. अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या, पण परागना वाचवण्यात यश मिळू शकलं नाही.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close