पुण्यातल्या कॉमनवेल्थ युथ गेम्समध्ये भारताच्या यशाला लागलं गालबोट

October 14, 2008 4:23 PM0 commentsViews: 7

14 ऑक्टोबर, पुणे – भारतीय नेमबाज कॉमनवेल्थ युथ गेम्समध्ये पदकांची लयलूट करत असतानाच आज भारताच्या या यशाला थोडसं गालबोट लागलं.भारतासाठी कॉमनवेल्थ युथ गेम्समध्ये पहिलं मेडल जिंकणारा अंकुश भारद्वाज याने 50 मीटर पिस्तुल आणि 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात भारताला गोल्ड मेडल जिंकून दिलं आहे हे खरं. पण त्याच्यावर वय चेरल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. कॉमनवेल्थ युथ गेम्समध्ये फक्त 22 वर्षांखालील खेळाडूंनाच फक्त भाग घेता येतो आणि अंकुशचं वय 24 वर्ष असल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. याबाबत सध्या अत्यंत गोपनीयता बाळगणयात येत आहे.सुत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार अंकुशचा पासपोर्ट त्याला स्पर्धा संयोजकांकडे जमा करण्यास सांगण्यात आला आहे.

close