महागाईबाबत समंजसपणा दाखवा

April 8, 2010 5:33 PM0 commentsViews: 3

8 एप्रिलजीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किंमतींची समस्या मोठी आहे. पण राजकीय पक्षांनी यावर आंदोलन न करता समंजसपणा दाखवावा, असे आवाहन आज पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केले. पंतप्रधानांनी आज मुख्यमंत्र्यांच्या कोअर कमिटीची महागाईच्या मुद्द्यावर बैठक घेतली. या बैठकीला कृषिमंत्री शरद पवारही उपस्थित होते. डाव्या पक्षांचे आंदालन वाढत्या महागाईविरोधात डाव्या प्रकाश करात, ए. बी. वर्धन यांसारख्या डाव्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी आज दिल्लीत जेलभरो आंदोलन केले. यूपीए सरकार महागाईला रोखण्यात सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. याच मुद्द्यावर डाव्यांनी आज देशव्यापी जेलभरो आंदोलन केले.

close