आदर्श सोसायटीची इमारत लष्कराच्या ताब्यात

July 29, 2016 5:17 PM0 commentsViews:

aadarsh_4मुंबई, 29 जुलै : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशनंतर आज मुंबईतल्या वादग्रस्त 31 मजली आदर्श इमारतीचा लष्काराने ताब्यात घेतली आहे. न्यायदंडाधिकार्‍यांच्या उपस्थितीत ही कारवाई पार पडली.

उच्च न्यायालयने आदर्श इमारत तोडण्याचा आदेश दिला होता. हा आदेश बदलण्यासाठी आदर्श सोसायटी सर्वोच्च न्यायालय गेली होती पण तिथे ही कोर्टाकडून त्यांना दिलासा मिळाला नाही. जो पर्यंत लिव्ह पिटीशन वर निकाल येत नाही तोपर्यंत आदर्श सोसायटीला एका आठवड्यात केंद्र सरकारच्या ताब्यात द्या, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं होतं. त्यानुसार पंजाब बटालियनने आदर्श सोसायटी ताब्यात घेतली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close