आंबेडकर भवनाच्या एकाही दगडाला हात लावायचा नाही : कोर्ट

July 29, 2016 5:40 PM1 commentViews:

court_on_ambedkar_bhavanमुंबई, 29 जुलै : आंबेडकर भवनाच्या एकाही दगडाला हात लावू नका आणि दोन्ही पक्षांना कोणताच वाद करू नका नाहीतर कायदेशीर कारवाई करू असा आदेशच मुंबई हायकोर्टानं दिलाय . यासंदर्भात पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे. आंबेडकर भवनाचं काम श्रमदानातून करण्याचं आवाहन भारिपचे प्रकाश आंबेडकर यांनी समाजाला केलं होतं.

दादर येथील बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक चळवळीसाठी उभारलेलं हे आंबेडकर भवन नामशेष झालंय. पिपल्स इम्प्रुमेंट ट्रस्टने मध्यरात्री कुणाला खबर न लागू देता ही आंबेडकर भवन जमीनदोस्त केलं. त्यांच्या या कृत्यामुळे दलित चळवळीत संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला. आंबेडकर भवनाची इमारत मोडकळीस असल्याचा दावा ट्रस्ट कडून करण्यात आला. पण, ही इमारत मजबूत असल्याचा रिपोर्ट पालिकेच्या अभियंत्यानं दिल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. या प्रकरणी प्रकाश आंबेडकरांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली. आज झालेल्या सुनावणीत हायकोर्टाने प्रकाश आंबेडकरांना फटकारून काढलं. पुढील आदेश येईपर्यंत आंबेडकर भवन येथील एकाही दगडाला हात लावायचा नाही. तिथे कोणताही कार्यक्रम घ्यायचा नाही आणि कोणताही वाद घालायचा नाही असे आदेश कोर्टाने दिले आहे. जर कुणी कायदा हातात घेतल्यास पोलिसांना कारवाई करावी असे आदेशही पोलिसांना कोर्टाने दिलेय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


  • sachin aherkar

    —- कायदा सर्वांना समान असावा एकाला एक आणि एकाला एक असू नये सरकार एकिकडे अनअधिकृत बांधकामांना आभय देते तर दुसरी कडे नियमित करते. आंबेडकर भवन असो वा कोणतेही सार्वजनिक अथवा धार्मिक स्थळ कायद्याला आणि समाजाला बाधक असल्यास त्यावर कायद्याच्या चौकटीत कायदेशीर कारवाई होऊन जनकल्यांणांच्या योजना राबल्या गेल्या पाहिजे. हा सारासार विचार परंतु कायदा आणि राजकारण फक्त देखावा करते वास्तव मात्र विदारक आणि भकास आहे.

close