बोलूच न दिल्याने खडसेंचं भाजप आमदारांच्या बैठकीतून ‘वॉकआऊट’

July 29, 2016 6:38 PM0 commentsViews:

khadse33329 जुलै : आजपर्यंत भाजप आमदारांच्या बैठकीला मार्गदर्शन करणार्‍यामध्ये भाजप नेते एकनाथ खडसे अग्रभागी होते. पण कालरात्री झालेल्या बैठकीत आमदारांना मार्गदर्शन करताना खडसे याना संधीच देण्यात आली नाही. आपल्याला बोलण्यासाठी डावलला जातंय हे लक्षात येताच खडसेंनी सभागृह सोडलं, त्यातून खडसेंच्या नाराजीची चांगलीच कुजबुज रंगली.

दरवर्षी आमदारांचं मार्गदर्शन वर्गासाठी कामकाज करताना अध्यक्षांच्या भाषणापूर्वी बोलण्याचा मान खडसेंना होता. पण गुरुवारी व्ही सतीश यांच्या भाषणानंतर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे बोलायला उभे राहिले. दानवेंनंतर मुख्यमंत्री बोलतात. हे स्पष्ट आहे. दानवे
बोलायला उभे राहिल्यानंतर खडसे नाराज होत सभागृह सोडलं. सभागृहातून खडसे बाहेर गेल्याने त्यांना कुणी थांबवण्याचा प्रयत्न देखील केला नाही. याचीच कुजबुज आमदारमध्ये सुरू होती.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close