धाकधुक संपली, ‘मैत्रेय’च्या गुंतवणुकदारांना पैसे मिळाले

July 29, 2016 8:20 PM0 commentsViews:

नाशिक, 29 जुलै : मेहनतीने कमावलेला पैसा गुंतवणूक करण्याचा मोह सर्वांनाच असतो. पण असाच मोह मात्र मैत्रेयमध्ये गुंतवणुकदारांच्या अंगलट आला. पण, ाोलीस आयुक्त एस जगन्नाथन यांच्या पुढाकारामुळे सर्व गुंतवणुकदारांचे पैसे व्याजासह मिळण्यास सुरुवात झालीये. आज इतक्या दिवसांपासून धाकधाकू लागून असलेल्या गुंतवणूकदारांच्या हाती आपला पैसा व्याजासह मिळाल्यामुळे हास्य उमटले.maitrya

नाशिकमध्ये मैत्रेय कंपनीच्या ठेवीदारांना पैसे परत मिळायला सुरुवात झालीये. आज 125 ठेवीदारांना पोलीस आयुक्त एस जगन्नाथन यांनी डिमांड ड्राफ्टद्वारे ही रक्कम दिली. या ठेवीदारांनी कंपनीत ठेवलेल्या मुदतठेवीची रक्कम व्याजासह परत मिळतेय. आज ठेवीदारातील जुन्या 125 ठेवीदारांना एका विशेष कार्यक्रमात पोलीस आयुक्त एस जगन्नाथन यांच्या हस्ते डिमांड ड्राफ्टनं ही रक्कम दिली जातेय. विशेष म्हणजे अशा प्रकारे रक्कम परत करण्याचा हे राज्यातील पहिलंच उदाहरण.

मैत्रेयच्या व्यवस्थापकीय संचालक यांना नाशिक जिल्हा न्यायालयानं अंतरीम जामीन मंजूर केला, पण तो करताना काही अटींचं बंधन टाकलं. सर्व ठेवीदारांना व्याजासहीत पैसे परत देण्याचं बंधन यातील प्रमुख अट आहे. ही अट वर्षा सत्पाळकर यांनी मान्य केल्यानंतर उघडलेल्या एस्क्रो खात्यात आतापर्यंत साडेसहा कोटी मैत्रेयनं जमा केले आहे. आता कमिटीनं निश्चित केल्यानुसार यातील 125 ठेवीदारांना पैसे परत केल्यानंतर जवळपास साडेचार हजार ठेवीदारांच्या खात्यात थेटपैसे जमा केले जाणार आहे.जिल्ह्यातील पैसे पूर्ण दिल्यानंतर याच मानांकनानुसार राज्यातील मैत्रेयच्या ठेवीदारांना परत दिले जाणार आहे. ठेवीदारांना दिलासा देणार्‍या या नाशिक पॅटर्नचा उपयोग आता राज्यातील अश्या प्रकरणात केला जावा असं कोर्टानं सूचित केलंय. हा पूर्ण तपास करीत असताना एस्क्रोची संकल्पना अप्पर
पोलीस महासंचालक एस जगन्नाथन यांच्या मनात आली आणि योग्य पद्धतीनं मांडणी करत त्यांनी कोर्टाकडून ती मंजूरही करुन घेतली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close