लातूरच्या स्नेहाधार संस्थेच्या 3 मुलांचा बुडून मृत्यू

July 30, 2016 2:17 PM0 commentsViews:

latur323लातूर – 30 जुलै : जिल्ह्यातल्या उदगीरच्या स्नेहाधार संस्थेच्या तीन मुलांचा बुडून मृत्यू झालाय. बुडालेली तीनही मुलं एचआयव्हीग्रस्त होती. संस्थेतल्या सुरक्षा रक्षकाचा डोळा चुकवून ही मुलं पोहण्यासाठी संस्थेच्या शेजारी असलेल्या शेततळ्यात गेली होती. पोहण्यासाठी गेलेल्या तिघांनाही पाण्याचा अंदाज आला नाही. तिघांचाही बुडून मृत्यू झाला.

उदगीर शहराच्या बाहेर शेल्हाळ रोडवर असलेल्या स्नेहआधार या संस्थेतील चार मुले शेजारच्या शेतातील शेततळ्यात खेळण्यासाठी गेली होती. दोन मुले बुडत असताना तिसरा मुलगा वाचविण्यास गेला असता तोही बुडाला. यावेळी लांब उभ्या असलेल्या चौथ्या मुलाने स्नेहाधारकडे पळत जावून या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि मदतकार्याला सुरुवात झाली थोड्या वेळानंतर दोन मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळालं मात्र तिसरा मृतदेह काढण्यासाठी तब्बल आठ तास प्रयत्न करावे लागले. काल संध्याकाळपर्यंत दोन मृतदेह बाहेर काढले होते. एक मृतदेह आज सकाळी सापडला. तीन मुलं बुडाल्यानं स्नेहाधार संस्थेवर शोककळा पसरलीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close