आणखी एक पाईपलाईन फुटली

April 9, 2010 8:45 AM0 commentsViews:

9 एप्रिलऐन उन्हाळ्यात मुबंईतील पाईपफुटीचे प्रकार काही थांबायला तयार नाहीत. आज पुन्हा एकदा ठाण्याला पाणी पुरवणारी पाईपलाईन फुटली आहे. ही 60 इंचाची पाईपलाईन शीळ फाटा रोडवरच्या खिडकाळी मंदिराजवळ फुटली आहे. पाण्याचा मोठा ओघ सुरू झाला आहे. परिसर जलमय होऊन गेला आहे. या पाईपफुटीमुळे आता ठाण्याच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे.