पुण्यात निर्माण झालं स्पोर्टिंग स्पिरिट

October 14, 2008 4:31 PM0 commentsViews: 2

14 ऑक्टोबर, पुणे – आजचा कॉमन वेल्थ युथ गेमचा दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी भारतानं शूटींगमध्ये दोन गोल्डची कमाई केली. पण दुसर्‍या दिवशी मात्र भारताचं मेडल अगदी थोडक्यात म्हणजे दोन पॉइंट्सनी हुकलं. पुरूषांच्या 50 मिटर रायफल प्रोन प्रकारात भारताच्या रुशद दमानीयाला चौथा क्रमांकावर समाधान मानावं लागलं. त्याचा स्कोर होता 679.3 तर ब्राँझ मेडल पटकावलेल्या स्कॉटलंडच्या रॉरी मॅकअपाईनचा स्कोर होता 681.4, इंग्लंडच्या जेम्स हकलनं 686.6 असा स्कोर करत गोल्ड पटकावलं तर 686.5 पॉइंट्स मिळालेल्या नॉर्थर्न आयर्लंडच्या मॅथ्यु हॉलनं सिल्व्हर मेडल पटकावलं..कॉमनवेल्थ युथ गेम्समध्ये भारताची कामगिरी समाधानकारक होते. दुसर्‍या दिवशीही भारताच्या खेळाडूंची आगेकूच सुरूच राहिली आहे. टेनिसमध्ये पुरूषांच्या एकेरी स्पर्धेत भारताच्या भांबरी युकीनं तिसर्‍या फेरीत प्रवेश केला आहे. त्याने मलेशियाच्या विल्सन पॉलचा 6-0, 6-0 असा सरळ सेटमध्ये पराभव करत तिसर्‍या फेरीत प्रवेश मिळवलाय…कॉमनवेल्थ युथ गेम्समध्ये खास आकर्षण ठरली आहे. बॅडमिंटनपटू सायना नेहवाल बीजिंग ऑलिम्पिकनंतर ती पुण्यात आली आहे ती कॉमनवेल्थ युथ गेम्ससाठी.तिसर्‍या कॉमनवेल्थ युथ गेम्समध्ये 71 देशातल्या खेळाडू सहभागी झाले आहेत. या स्पर्धेत कोण जिंकणार, कोणाला किती मेडल मिळणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

close