भांबोरा छेडछाड प्रकरणी 1 आरोपीस पोलीस कोठडी, दोघांची बालसुधारगृहात रवानगी

July 30, 2016 8:56 PM0 commentsViews:

bhambori330 जुलै : अहमदनगरमध्ये कोपर्डीनंतर आता जवळच्याच भांबोरा गावातही शाळकरी मुलीची छेड काढल्याची घटना गुरुवारी घडली.या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून 3 आरोपीना अटक करण्यात आली होती. या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता 1 आरोपीला 3 आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असून दोन आरोपीना बालसुधार गृहात पाठविण्यात आले आहे. तर 2 आरोपी फरार आहेत.

कर्जत तालुक्यातील भांबोरा गावात एका अल्पवयीन मुलीची छेड काढून विनयभंग केल्याची घटना घडली होती. या प्रकरणामुळे
गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले होते. या घटनेनंतर संतप्त जमावाने आरोपींचं घरं उद्‌ध्वस्त केलं आहे. तसंच झोपड्याही पेटवून दिल्या आहेत. त्यामुळे गावात तणाव निर्माण झाला आहे. सध्या घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आहे. तसंच पालक मंत्री आणि रामशिंदे यांनी ग्रामस्थांची भेट घेतली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close