मोबाईलवर हायस्पीड इंटरनेट

April 9, 2010 9:01 AM0 commentsViews: 29

9 एप्रिलसगळ्या टेलिकॉम कंपन्या वाट बघत असलेल्या 3 Gच्या लिलावाला आज सकाळी 9 वाजता सुरूवात झाली. भारतात पहिल्यांदा या तिसर्‍या रेडिओ फ्रिक्वेन्सीचा हा लिलाव होत आहे. 3 Gच्या एका फ्रिक्वेन्सीसाठी सरकारकडून किमान किंमत 3 हजार 500 करोड ठरवण्यात आली आहे. आणि या पूर्ण प्रक्रियेत सरकारला 35 हजार कोटी रूपये मिळण्याची शक्यता आहे. 3 Gच्या सेवा म्हणजे इंटरनेट ऍक्सेसची थर्ड जनरेशन. कम्प्युटरवर जसे तुम्ही इंटरनेट ऍक्सेस करता, त्यापेक्षा जास्त स्पीडने तुम्ही इंटरनेट ऍक्सेस करू शकता. जिथे इंटरनेट जाऊ शकत नाही तिकडे थ्रीजीच्या माध्यमातून तुम्ही इंटरनेट वापरू शकता. मोबाईलच्या किंमती कमी होण्याच्याही शक्यता आहेत. आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांपैकी वोडाफोन एस्सार, आयडिया सेल्युलर, टाटा टेलिसर्व्हिसेस अशा कंपन्या 22 सर्व्हिस एरियात बोली लावणार आहेत. सध्या फक्त बीएसएनएलकडे हे थ्रीजीचे हक्क आहेत.'थ्रीजी'चे फायदे काय आहेत त्यावर आपण एक नजर टाकूया… तुमच्या मोबाइलवर ऍडिशनल सर्व्हिस मिळेल कनेक्टिव्हिटी वाढणारव्हिडिओ कॉल्स ची सेवा मिळू शकेल फास्टर इंटरनेट सर्व्हिसचा फायदा घेता येईल हायस्पीड डेटा एक्सचेंज करू शकालव्हिडिओ ऑन डिमांडची सेवा मिळेल इंटरनेट टीव्ही मोबाईलवर उपलब्ध असेल

close